Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) साक्षरतेसाठी विज्ञान मंडळाचा अभिनव उपक्रम ! ; सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाच्या प्रयत्नामुळे प्रशिक्षण नोंदणीत जिल्हा अग्रेसर.

  • अपडेट होऊन अध्यापनात AI चा वापर करण्याचे शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांचे आवाहन.

सावंतवाडी : आज आधुनिक तंत्रज्ञानात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची प्रत्येक क्षेत्रात घोडदौड सुरू असून शालेय शिक्षणात या तंत्राचा वापर करणे काळाची गरज बनली आहे.हीच गरज ओळखून महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ व समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “जनरेटिव्ह ए.आय.फॉर एज्युकेशन” म्हणजेच शिक्षणात AI वापर या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली आहे 2 जुलै ते 5 जुलै 2025 या कालावधीत होणाऱ्या या प्रशिक्षणाची आज संध्याकाळी 7.30 सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष दिनेश पवार,प्रमुख पाहुणे डॉ भाऊसाहेब कारेकर, शिक्षणाधिकारी (माध्य.),जिल्हा परिषद, पुणे ,डॉ गणपत मोरे शिक्षण उपसंचालक,पुणे विभाग, दत्ता आरोटे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ,रोहिदास एकाड सचिव,महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ,मार्गदर्शक, सुनील वानखडे,ॲडव्हान्स कम्प्युटर ट्रेनर मयूर आहेर, व अमोल कळंबे,उपप्राचार्य की एम.ए.एस. टी.आय.रिसोड यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सदर प्रशिक्षणात Chat GPT, Slidego  AI, Question well, Flexi AI, Wolfram Alpha, Magic school अशा अनेक तंत्रांचा शिक्षणात उपयोग याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.हे प्रशिक्षण ऑनलाईन असून राज्यभरातील शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणणारे आहे.या प्रशिक्षणासाठी सिंधुदूर्ग जिल्ह्यातून विक्रमी नोंदणी झाली असून विज्ञान मंडळाच्या या अभिनव उपक्रमाचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व मंडळीनी घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांनी केले आहे.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती असलेला हा जिल्हा ए आय साक्षरतेतही अग्रेसर व्हावा यासाठी होत असलेल्या विज्ञान मंडळाच्या या उपक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, डाएटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे तसेच मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles