Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

शुबमनचं शतक, यशस्वीचं अर्धशतक ! ; टीम इंडियाच्या पहिल्या दिवशी ३१० धावा.

एजबस्टन : इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारतासाठी पहिल्या दिवशी कर्णधार शुबमन गिल आणि ओपनर यशस्वी जैस्वाल या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. शुबमनने शतक खेळी केली. तर यशस्वीने 87 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 310 रन्स केल्या आहेत. तर इंग्लंडने 5 विकेट्स घेतल्या. खेळ संपला तेव्हा शुबमन आणि रवींद्र जडेजा ही जोडी नाबाद परतली.

पहिल्या दिवशी काय झालं?

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताला यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही सलामी जोडी चांगली सुरुवात मिळवून देण्यात अपयशी ठरली. भारताने 15 धावांवर केएल राहुलच्या रुपात पहिली विकेट गमावली. केएल 2 धावा करुन आऊट झाला. केएलननंतर करुन नायर मैदानात आला.

करुण मोठी खेळी करण्यात अपयशी –

यशस्वी आणि करुण नायर या दोघांनी भारताला पुढे नेलं. दोन्ही बाजूने दोघांनी संधी मिळेल तेव्हा फटके मारले. तसेच एकेरी-दुहेरी धावा घेत धावफळक हलता ठेवला. यशस्वी-करुणने दुसर्‍या विकेटसाठी 80 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र लंचब्रेकला काही मिनिटं बाकी असताना इंग्लंडला ही भागीदारी फोडण्यात यश आलं. ब्रायडन कार्स याने करुण नायर याला आऊट केलं. करुणने 50 बॉलमध्ये 5 फोरसह 31 रन्स केल्या.

यशस्वीचं शतक हुकलं –

करुणनंतर कॅप्टन शुबमन मैदानात आला. यशस्वी आणि शुबमन या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 88 रन्स जोडल्या. यशस्वी 87 धावांपर्यंत पोहचल्याने त्याला लीड्सनंतर सलग दुसरं शतक करण्याची संधी होती. मात्र यशस्वीच्या नशिबातच शतक करणं नव्हतं. यशस्वी आणि शुबमन या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 66 धावा जोडल्या. त्यानंतर यशस्वी 87 धावांवर आऊट झाला. यशस्वीने या खेळीत 13 चौकार ठोकले.

नितीशकडून निराशा –

यशस्वीनंतर शुबमनला साथ देण्यासाठी उपकर्णधार ऋषभ पंत मैदानात आला. ऋषभही सेट झाला. मात्र शोएब बशीरने पंतला सोपा बॉल टाकून मोठा फटका मारण्यास प्रवृत्त केलं आणि जाळ्यात अडकवलं. पंत फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला. पंतने 42 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह 25 रन्स केल्या. पंत आऊट झाल्यानंतर नितीश कुमार रेड्डी मैदानात आला. मात्र नितीशने निराशा केली. नितीश 1 धाव करुन आऊट झाला.

जडेजा-गिल जोडी जमली

नितीशनंतर अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा मैदानात आला. जडेजा आणि गिल जोडीने संयमी खेळी केली. शुबमनने या दरम्यान सलग दुसरं शतक ठोकलं. तर रवींद्र जडेजानेही शुबमनला चांगली साथ दिली. ही जोडी खेळ संपेपर्यंत नाबाद परतण्यात यशस्वी ठरली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद 99 रन्सची पार्टनरशीप केली. शुबमनने 216 चेंडूत 52.78 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 114 रन्स केल्या. तर रवींद्र जडेजा 67 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 41 धावा करुन नाबाद परतला आहे. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स याने 2 विकेट्स घेतल्या. तर ब्रायडन कार्स, कॅप्टन बेन स्टोक्स आणि शोएब बशीर या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवलीय.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles