बांदा : कृषी दिनानिमित्त पाडलोस मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक, दोन, तीन व ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा साकारत वृक्षदिंडीत नवचैतन्य आणले.
पाडलोस शाळा नंबर 1 ते कृषी विद्यापीठपर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी ‘वृक्ष बोले माणसाला, नको तोडू आम्हाला’, ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी, पाडलोस विकास सोसायटी व्हाइस चेअरमन, अंगणवाडी सेविका, आशासेविका, ग्रामसंघाचे पदाधिकारी, बचत गट व ग्रामस्थांनी वृक्षदिंडीत सहभाग घेतला. यावेळी तिन्ही शाळांचे पालक शिक्षक समिती अध्यक्ष उपस्थित होते.
——-
फोटो ——
पाडलोस : कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वृक्षदिंडी काढताना विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ.
पाडलोसमध्ये वृक्षारोपण, वृक्ष दिंडीस उत्स्फूर्त प्रतिसाद!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


