सावंतवाडी : अत्यंत सर्वसामान्य कार्यकर्ता, शिवसेना शाखा प्रमुख, युवक कॉंग्रेस अध्यक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान शहराध्यक्ष, नगरसेवक ते आरोग्य व क्रीडा सभापती अन् आता भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष…! अशा प्रत्येक पदाला न्याय देणारा डँशिंग, झुंजार सर्वसामन्यांचा हक्काचा माणूस अर्थात सुधीरभाई आडिवरेकर.!


‘सर्वसामान्य कार्यकर्ता ते युवा नेता’ हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेला भाजपचा हा युवा चेहरा युवाईच्या गळ्यातील ताईत बनलाय. आज त्यांच्या ५० वा वाढदिवस. आयुष्याच अर्धशतक झळकावलेला हा पैलवान शतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांना ”सुवर्ण महोत्सवी’‘ वाढदिनी हार्दिक शुभेच्छा….!
सुधीरभाई आडिवरेकर यांचा ५० वर्षांचा प्रवास थक्क करणारा आहे. प्रत्येक पदाला त्यांनी निष्ठेने न्याय दिला. डॅशिंग, झुंजार सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस म्हणून ते ओळखले जातात. सामान्य कुटुंबातून आलेला भाजपचा हा युवा चेहरा आज युवाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कॉलेज जीवनापासूनच गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारे हे व्यक्तिमत्व आहे. माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या कार्यकौशल्याच्या जोरावर जनतेच्या हदयात त्यांनी स्थान निर्माण केलंय. नगरसेवक म्हणून ५ वर्षांच्या या कार्यकाळात वेगळी छाप पाडली. जनतेच्या प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांना अंगावर घेत रखडलेली काम चुटकीसरशी मार्गी लावली. नगराध्यक्षांच्या पोटनिवडणुकीत भाजपची ते हक्काची वोट बँक होते. म्हणूनच आज शहराचा अध्यक्ष होण्याचा मान भाजपनं त्यांना दिला आहे.
नकोशा वाटणाऱ्या कोरोना काळात घरात बसून न राहता, शासनाच्या मदतीची वाट न पाहता हा नेता मैदानात होता. लोकांसाठी अहोरात्र झटत होता. यावेळी यंग ब्रिगेडची मोठी ताकद त्यांच्यासोबतीला होती. यातूनच त्यांनी आरोग्य सभापती म्हणून लक्षवेधी असं काम केल. नगरसेवक म्हणून पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी केलेलं काम, जनतेला दिलेला न्याय पाहता आगामी निवडणुकीत देखील ते मोठ्या मताधिक्यान विजयी होतील हे सांगायला कुण्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. आपलं नेतृत्व सुधीरभाईनीच कराव अशी लोकभावना आहे. शहरात त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष अधिक बळकट झाला आहे. येणाऱ्या काळात निश्चितच भाजपचा झेंडा हा झुंजार डौलानं फडकवत ठेवेलच. अशा या नेत्याला मनस्वी ५० व्या वाढदिनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!!


