वैभववाडी : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने दिला जाणारा कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२४ यावर्षी कणकवलीच्या सौ.श्रद्धा कदम यांना देऊन सन्मानित करण्यात आले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अधिवेशन कोल्हापुर येथे दिनांक २४ व २५ ऑगस्ट रोजी संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. ग्राहक केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने ग्राहक संघटन, ग्राहकाचे प्रबोधन आणि ग्राहकाला योग्य मार्गदर्शन करण्याचे पवित्र कार्य केले जाते.
महाराष्ट्रातील तेवीस जिल्ह्यात संस्थेचे कार्य सुरू असून कार्यकर्त्याचे प्रबोधन करण्याच्या उद्देशाने प्रत्येक वर्षी राज्य अधिवेशनाचे आयोजन केले जाते. कोल्हापूर येथील अधिवेशनात कोकण विभागाचा “उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२४” ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कणकवली तालुका शाखेच्या अध्यक्षा सौ. श्रद्धा कदम यांना देऊन सन्मानित करण्यात आले. सौ. श्रद्धा कदम यांनी मागील वर्षभरामध्ये केलेल्या ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, ग्राहक मार्गदर्शन तसेच सजग विद्यार्थी ग्राहक प्रबोधन या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. याबद्दल सर्व थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे राज्यसचिव अरुण वाघमारे, संघटक सर्जेराव जाधव, सहसंघटिका मेधाताई कुलकर्णी, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष व राज्य सहसचिव प्रा.एस.एन. पाटील, कोषाध्यक्षा सौ.सुनीता राजेघाडगे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बी. जे. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रद्धा कदम यांना ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचा ‘उत्कृष्ट कार्यकर्ता’ पुरस्कार-२०२४ प्रदान. ; कोल्हापूर येथील राज्य अधिवेशनात केले सन्मानित.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


