वैभववाडी : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने दिला जाणारा “श्रमिक पुरस्कार-२०२४” यावर्षी कोकण विभागातून श्री. सचिन तळेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अधिवेशन कसबा बावडा, कोल्हापुर येथे दिनांक २४ व २५ ऑगस्ट रोजी संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. ग्राहक केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने अर्थव्यवस्थेचे पंचप्राण असलेल्या शेतकरी, व्यापारी, उद्योजक, श्रमिक आणि ग्राहक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी कोकण विभागातून श्रमिक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. यामधून वैभववाडी तालुक्यातील सोनाळी गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते, वैभववाडी तालुका रिक्षा संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच जिल्हा रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष या पदांवर कार्यरत आहेत.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने ग्राहक संघटन, ग्राहकाचे प्रबोधन आणि ग्राहकाला योग्य मार्गदर्शन करण्याचे पवित्र कार्य केले जाते. महाराष्ट्रातील तेवीस जिल्ह्यात संस्थेचे कार्य सुरू असून कार्यकर्त्याचे प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने प्रत्येक वर्षी राज्य अधिवेशनाचे आयोजन केले जाते. यावेळी समाजातील अर्थव्यवस्थेचे पंचप्राण असलेल्या घटकांचा पंचप्राण पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.श्री. सचिन तळेकर यांनी वैभववाडी तालुका रिक्षा चालक- मालकांचे संघटन, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व रिक्षा प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा केलेला प्रयत्न आदी कामाची दखल घेऊन
हा पुरस्कार देण्यात आला आहे. याबद्दल सर्व थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष डॉ.प्रवीण खोत, महावितरण कोल्हापूरचे मुख्य अभियंता श्री.स्वप्निल काटकर, पुणे महावितरणचे मुख्य अभियंता श्री.राजेंद्र पवार
संस्थेचे राज्यसचिव श्री.अरुण वाघमारे, संघटक श्री.सर्जेराव जाधव, सहसंघटिका सौ. मेधाताई कुलकर्णी, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष व राज्य सहसचिव प्रा.श्री.एस.एन. पाटील, कोषाध्यक्षा सौ.सुनीता राजेघाडगे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री.बी.जे.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सचिन तळेकर यांना ‘श्रमिक पंचप्राण पुरस्कार-२०२४’ प्रदान. ; ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या कोल्हापूर येथील राज्य अधिवेशनात केले सन्मानित.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


