दोडामार्ग : गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा 2025 या शालाबाह्य परीक्षेमध्ये दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या इयत्ता 5 वी व 6 वीतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय यश संपादन केले. त्यामध्ये इयत्ता पाचवीतील कुमारी स्वानंदी महेंद्र मणेरीकर दोडामार्ग तालुक्यात प्रथम व कुमारी सान्वी शैलेश नाईक द्वितीय क्रमांक प्राप्त केला. इयत्ता सहावीतील कुमारी वेदिका अजित कळणेकर हीने तालुक्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डाॅ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी. एल. नाईक, सचिव व्ही. बी. नाईक, मुख्याध्यापक प्रल्हाद महादेव सावंत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले.


