सावंतवाडी : आजगाव येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक १ च्या उच्च श्रेणी मुख्याध्यापिका ममता मोहन जाधव या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्या आहेत.

त्यांच्या या शैक्षणिक सेवेच्या पूर्ततेबद्दल त्यांचा ग्रामपंचायत आजगाव यांच्या वतीने सरपंच सौ. यशश्री सौदागार व इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्यावतीने स्नेह सत्कार करण्यात आला.


तसेच आजगाव शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ तसेच सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी संघ सचिव श्री. मठकर सर, माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती दूर्वा साळगावकर आदींनी त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.

यावेळी ममता जाधव यांना अत्यंत भावुक झाल्या. आपले आजगाव गावाशी भावनिक नाते असून पुढील काळात हे नाते अजून वृद्धिंगत करण्यासाठी तसेच शाळेसाठी मला कधीही हाक मारावी, मी नेहमीच शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असल्याची त्यांनी ग्वाही दिली. दरम्यान सौ. ममता जाधव यांच्यावर सेवापूर्तीनिमित्त विविध स्तरावरून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


