कणकवली : कणकवलीचे सुपुत्र, ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य आणि विविध सामाजिक संस्थामधील हाडाचे व सक्रिय कार्यकर्ते सीताराम उर्फ दादा कुडतरकर (वय 65 वर्षे ) यांचे आज पहाटे आकस्मित दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून सामाजिक स्तरावर हळहळ व्यक्त होत आहे. त्यांना ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.



 

