सावंतवाडी : सातार्डा गावची कन्या कु. नेहा तुळशीदास मयेकर हिने आसाममधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फर्मा क्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (NIPER), गोहटटी येथे एम. फार्मा. पदवीमध्ये सुवर्णपदक मिळवून सावंतवाडीचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकावले आहे. आसामचे राज्यपाल लक्ष्मीप्रसाद आचार्य यांच्या हस्ते तिचा नुकताच सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला.
ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेल्या नेहाने हे नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. तिने सावंतवाडीच्या यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमधून बी. फार्मा. ही पदवी विशेष प्रावीण्यात मिळवली. त्यानंतर, देशपातळीवरील GPAT आणि NIPER यांसारख्या अत्यंत प्रतिष्ठित प्रवेश परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळवले. यासोबतच, भारत सरकारची राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त करत तिने देशातील पहिल्या पाच महाविद्यालयांमध्ये गणल्या जाणाऱ्या गोहट्टी येथील राष्ट्रीय कॉलेजमध्ये एम. फार्मा.साठी प्रवेश निश्चित केला.
आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तिने या ठिकाणीही आपल्या बुद्धिमत्तेची छाप सोडली आणि Pharmacology and Texocology (औषधशास्त्र आणि विषशास्त्र) या विषयात सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिला NIPER मधून थेट गुजरात, अहमदाबाद येथील भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या Zydus च्या संशोधन केंद्रामध्ये नियुक्ती मिळाली आहे. नेहाचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
सातार्डाच्या सुकन्येचे राष्ट्रीय स्तरावर सोनेरी यश ! ; नेहा मयेकरने पटकावले एम. फार्मामध्ये सुवर्णपदक.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


