Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

त्यांनी माझ्या ब्लाऊजमध्ये.. ; ‘ह्या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला मंदिरात पुजाऱ्याकडून चुकीच्या पद्धतीने स्पर्श.

मुंबई : मलेशियातील भारतीय वंशाची मॉडेल आणि अभिनेत्री लिशालिनी कनारनने एका भारतीय पुजाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. लिशालिनीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित या घटनेबद्दल सांगितलं आहे. एका मंदिरातच तिच्यासोबत पुजाऱ्याने गैरवर्तन केल्याचा आरोप लिशालिनीने केला. गेल्या महिन्यात ती एकटी मंदिरात गेली होती, तेव्हाच तिच्यासोबत पुजाऱ्याने हे कृत्य केल्याचं तिने सांगितलं आहे. संबंधित पुजाऱ्याने पवित्र पाण्याचं नाव घेऊन तिच्यासोबत हे कृत्य केलं. लिशालिनीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून संपूर्ण घटना सांगितली आहे. त्याचसोबत तिने याप्रकरणी पुजाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली आहे. ‘मी फार धार्मिक व्यक्ती नाही. पूजा करताना देवासमोर प्रार्थना कशी करावी आणि काय बोलावं हे मला माहीत नव्हतं. पण गेल्या काही आठवड्यांपासून मी मंदिरात जाऊ लागले आहे आणि पूजा-प्रार्थनेबद्दल काही गोष्टी शिकत आहे. 21 जून रोजी माझी आई भारतात होती, म्हणून मी एकटीत मंदिरात गेले. हे तेच मंदिर आहे, जिथे मी नेहमीच जात होती. तिथे एक पुजारी आहे, जे सहसा मला विधींबद्दल सांगायचे. कारण त्या सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. मला त्यातलं फार काही माहीत नव्हतं. त्यांनी केलेल्या मदतीबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. परंतु त्यादिवशी मी प्रार्थना करताना ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले की त्यांच्याकडे एक धागा आणि पवित्र पाणी आहे’, असं तिने सांगितलं.

या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलं, ‘त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी माझी पूजा संपवली आणि त्यांच्याकडे गेले. त्यादिवशी शनिवार होता आणि मंदिरात खूप गर्दी होती. तिथे ते एकमेव पुजारी होते. त्यांनी मला प्रतीक्षा करायला सांगितलं. जवळपास दीड तास वाट पाहिल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या मागे येण्यास सांगितली. त्यांनी ते पवित्र पाणी आणि धागा घेतला आणि त्यांच्या कार्यालयाच्या दिशेने चालू लागले. मी त्यांच्या मागे जात होती. पण मला ते योग्य वाटत नव्हतं. त्यांनी मला तिथे बसायला सांगितलं आणि स्वत: उभे राहिले. त्यांनी पवित्र पाण्यात गुलाबजलसारखं काहीतरी उग्र वासाचं द्रव ओतलं. ते म्हणाले की त्यांनी ते भारतातून आणलंय आणि सहसा ते सर्वसामान्य लोकांना दिलं जात नाही. ते पाणी माझ्या तोंडावर शिंपडत होते आणि त्यामुळे मी माझे डोळे उघडू शकत नव्हती. त्यानंतर त्यांनी मला माझा पंजाबी सूट वर करण्यास सांगितलं. मी नकार दिला. हे माझ्या भल्यासाठीच आहे, असं ते बडबडत राहिले. तरीही मी त्यांना नकार देत राहिले. त्यांनी पुन्हा माझ्या तोंडावर पाणी शिंपडलं आणि माझ्या मागे येऊन उभे राहिले.’

‘ते काहीतरी बडबडत राहिले, मला त्यातलं काहीच समजत नव्हतं आणि अचानक त्यांनी माझं डोकं धरलं. काहीतरी बडबडत त्यांनी ते मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत राहिले. माझ्या मेंदूला सर्वकाही समजत होतं की हे खूप चुकीचं चालू आहे, पण तरीही मी तिथून उठू शकले नव्हते. मी काहीच बोलू शकले नाही. मी स्तब्ध झाले होते आणि का ते मला अजूनही समजत नाही. मी सर्व ठिकाणी एकटी जायचे. काम, मिटींग्स, कार्यक्रम आणि पार्ट्यांनाही.. पण कोणीच कधी मला अशा पद्धतीने स्पर्श केलं नव्हतं. पण ज्या एका ठिकाणी मला वाटलं की मानसिक शांती मिळेल, तिथे मी परमात्माशी जोडली जाईन, तिथेच असं घडल्याचं मला फार दु:ख आहे. मी फार सविस्तर बोलणार नाही. पण पुजाऱ्याने माझा विनयभंग केला आणि मी त्यावर काहीच बोलू शकले नाही’, अशा शब्दांत तिने घडलेली घटना सांगितली.

या पोस्टच्या अखेरीस लिशालिनीने सांगितलं की तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी उलट तिलाच समजावण्याचा प्रयत्न केला की याबद्दल सोशल मीडियावर काही लिहू नकोस, अन्यथा लोक तुलाच दोष देतील. मंदिराच्या व्यवस्थापकांनीही मंदिराचं नाव खराब होऊ नये म्हणून पोलिसांसोबत मिळून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप तिने केला आहे. या पोस्टच्या शेवटच्या स्लाइडमध्ये तिने मंदिराचा फोटो आणि नाव शेअर केलं आहे. त्याचप्रमाणे असं काही घडल्यास गप्प बसू नका, असा सल्ला तिने इतरांना दिला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles