सावंतवाडी: शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूल संचालित आनंद शिशुवाटिका प्रशालेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे स्वागत आणि औक्षण करून त्यांची पाद्यपूजा केली.
या सोहळ्यासाठी शिशुवाटिकेच्या शिक्षिका, कर्मचारी वर्ग, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थी आणि पालकांनी या सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला.


