सावंतवाडी : आपल्या देशाची लोकसंख्या 141 कोटी असून महाराष्ट्र राज्याच्या देशात लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. लोकसंख्या वाढीमुळे भविष्यात अन्नधान्य टंचाईला सामोरे जावे लागेल भूकबळीची संख्या, पाणीटंचाई तसेच बेरोजगारीही वाढेल. आपला समाज कुटुंबाचा ‘वारस’ म्हणून मुलाची वाट पाहतो. त्यामुळेच लोकसंख्येत भरमसाठ वाढ होऊ शकते छोटे. ‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब’, ‘एकचं सूर एकचं मुल’ असा विचार सर्वांनी केल्यास लोकसंख्या नियंत्रण येऊ शकेल. लोकांमध्ये जाणीव जागृती व्हावी, यासाठी आजचा दिवस साजरा केले जातो, असे विचार प्रमुख राजेश गुडेकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथील नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘जागतिक लोकसंख्या दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपस्थित असलेले आर. के. राठोड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल कांबळे यांनी प्रास्तावित केले तर आभार प्रदर्शन लहू जाधव यांनी केले. कार्यक्रमास एम.पी. सारंग, यू. यू. राऊळ, नितीन धामापूरकर, के. पी. मयेकर, कडावलकर मॅडम आदी उपस्थित होते.
ADVT –


