Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, नोंदवला गेला वर्ल्ड रेकॉर्ड ! ; तब्बल ४१ षटकारांसह ठोकल्या ४८७ धावा.

सोफिया : एसीएन बल्गेरिया टी -20 ट्राय सिरीजमध्ये एक मोठा विक्रम रचला गेला आहे. एकाच सामन्यात धावांचा पाऊस पडला. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांना षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहता आली. हा सामना बल्गेरिया आणि जिब्राल्टर यांच्यात खेळला गेला. हा सामना बल्गेरियाने जिंकला असला तरी दोन्ही बाजूच्या फलंदाजांनी गोलंदाजांची धुलाई केली. टी – 20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 14.18 च्या धावगतीने धावा केल्या गेल्या. यापूर्वी 2009 मध्ये असं घडलं होतं. तेव्हा न्यूझीलंड आणि स्कॉटलंड हे संघ आमनेसामने आले होते. तेव्हा 13.76 च्या धावगतीने धावसंख्या झाल्या होत्या. पण या सामन्यात काही चित्र वेगळं होतं. एकूण 41 षटकार मारण्यात आले. तर दोन्ही डावांमध्ये मिळून 35 पेक्षा कमी षटकात 450 हून अधिक धावा केल्या आणि जुना विक्रम मोडला गेला आहे.

या विजयासह बल्गेरियाचा संघ गुणतालिकेत चार गुणांसह अव्वल स्थानी आहे. जिब्राल्टर पराभूत झाला असला तरी त्यांच्याकडेही चार गुण आहेत. पण नेट रनरेटच्या गणितात बल्गेरिया पुढे आहे. तुर्की या मालिकेत सहभागी असून दोन्ही सामन्यात पराभूत झाली आहे. त्यामुळे अंतिम फेरीत बल्गेरिया आणि जिब्राल्टर हा सामना होईल.

ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….! – शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ – व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल – सावंतवाडी.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles