Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

तळवडे येथील जनता विद्यालयाचे चार विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी पात्र !

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील चार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

इयत्ता आठवीतील शंभू गणपत पांढरे याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २१२ गुण प्राप्त करून राष्ट्रीय ग्रामीण विभागातून जिल्ह्यात अकरावा क्रमांक प्राप्त केला आहे. तर सावंतवाडी तालुक्यातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

तसेच कु. श्रावणी यशवंत दळवी या विद्यार्थिनीने या परीक्षेत ३०० पैकी १८६ गुण प्राप्त करून जिल्हा ग्रामीण विभागातून ४३ वा क्रमांक प्राप्त केला आहे तर सावंतवाडी तालुक्यातून सहावा क्रमांक पटकाविला आहे.

तसेच कु. भार्गवी विठोबा पेडणेकर या विद्यार्थिनीने या परीक्षेत ३०० पैकी १७८ गुण प्राप्त करून जिल्हा ग्रामीण विभागात जिल्ह्यात ६३ वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. तर सावंतवाडी तालुक्यातून दहावा क्रमांक पटकाविला आहे.

तसेच कु. गार्गी सचिन कांबळी या विद्यार्थिनीने या परीक्षेत ३००पैकी १७६ गुण प्राप्त करून जिल्हा ग्रामीण विभागात ६८ वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. तर सावंतवाडी तालुक्यातून चौदावा क्रमांक पटकाविला आहे

या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या सर्व शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष विष्णू पेडणेकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पेडणेकर, खजिनदार डॉ. भालचंद्र कांडरकर, मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर तसेच सर्व संस्था पदाधिकारी, संचालक व सदस्य तसेच पालक -शिक्षक संघाचे व माता-पालक संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles