- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयटीआयमध्ये रोजगार प्रशिक्षणासाठी १२० कोटींचा निधी मंजूर.
- चिपी विमानतळ सुशोभीकरण, विज वितरण प्रलंबित कामे,सीसीटीव्ही चे जाळे निर्माण करणार.
- सिंधुदुर्ग जिल्हावासीयांच्या विकासासाठी मी कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे.
कणकवली : पालघर जिल्ह्यात होत असलेल्या वाढवण बंदराचा फायदा सिंधुदुर्गलाही होणार आहे. पहिल्या टप्प्यात 5 ते 7 हजार नोकऱ्या उपलब्ध होतील. त्यासाठी ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे त्यात सिंधुदुर्ग चा समावेश आहे. वाढवण बंदरात निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी ट्रेनिंग सिंधुदुर्ग जिह्यातील आयटीआय मध्ये दिले जाणार आहे. या ट्रेनिंग साठी राज्य सरकारने 1२० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे साहजिकच सिंधुदुर्गातील युवाई च्या हाताला रोजगार मिळणार आहे. असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,महायुतीच्या राज्य सरकारला दीडशे दिवस पूर्ण होत असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण तरुणींना रोजगाराची नवीन दालने उघडली जात आहेत. विजवीतरणच्या प्रलंबित कामांसाठी 70 कोटी
चिपी विमानतळ सुशोभिकरणसाठी 1 कोटी दिले आहेत. जिल्ह्यात पोलीस दल सक्षम होण्यासाठी जिल्ह्याभरात सीसीटीव्ही चे जाळे बसवणार आहोत. पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्हावासीयांच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी सिंधुदुर्ग चा प्रतिनिधी म्हणून मी प्रयत्न करत असल्याचेही नामदार नितेश राणे यांनी सांगितले.
GOOD NEWS – सिंधुदुर्गातील तरुणांसाठी वाढवण बंदर येथे रोजगाराची नवी दालने, पहिल्या टप्प्यात ५ ते ७ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार! : पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


