सावंतवाडी : शहरातील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये मान्सून स्पोर्ट्स उत्साहात संपन्न झाले. दिनांक 11व 12 जुलै रोजी प्रशालेत दोन दिवसीय भव्यदिव्य मान्सून स्पोर्ट्सचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये फुटबॉल, हॉलीबॉल,बास्केटबॉल, रस्सीखेच, कबड्डी, डॉजबॉल या खेळांचे आयोजन करण्यात आले होते.दिनांक 11जुलै रोजी उदघाटनाचा दिमाखदार कार्यक्रम पार पडला.प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी व नॅशनल लेव्हल कॅरमपटू केशर निर्गुण व उपरकर शूटिंग अकॅडेमीचे संचालक श्री. कांचन उपरकर उपस्थित होते. तसेच प्रशालेचे मॅनेजर फादर मिलेट डिसोझा देखील उपस्थित होते.क्रीडाज्योत प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना यांनी सर्वांना शुभसंदेश दिला व आपल्या जीवनातील खेळाचे महत्व स्पष्ट केले.यावेळी हायस्कूल पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर, इंग्रजी पर्यवेक्षिका श्रीम.क्लिटा परेरा, मराठी प्रायमरी मुख्याध्यापिका सिस्टर कविता उपस्थित होत्या.
दिनांक 12जुलै रोजी विजेत्या संघाना मेडल्स व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.


