वेंगुर्ला :फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जीवन शिक्षण शाळा आरवली नं.१ चा विद्यार्थी कु. आराध्य निंगोजी कोकितकर याने राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठवा आणि वेंगुर्ला तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाचवा आणि सन 2024/25 मध्ये झालेल्या महावाचन स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे.गणित प्राविण्य या परीक्षेत पहिला आलेला आहे.या शाळेतील चार विद्यार्थी परीक्षेला पात्र झाले असून या गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ. सौ.नेहा गावडे व सदस्य, गटशिक्षणाधिकारी श्री. संतोष गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कोनकर सर, केंद्रप्रमुख श्री. आव्हाड सर, तसेच समस्त आरवली ग्रामस्थांनी त्याचे विशेष अभिनंदन केले. त्याच्या या यशासाठीआरवली शाळेचे मुख्याध्यापक सौ. वैभवी रायशिरोडकर, वर्गशिक्षक सौ. सविता सातपुते, सौ. संजिवनी कोकितकर, सौ. प्रियदर्शनी म्हाडगूत यांचे मार्गदर्शन मिळालेले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत आराध्य कोकितकर वेंगुर्ला तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात आठवा. ; जीवन शिक्षण शाळा आरवली नंबर १ चा विद्यार्थी.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


