Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सिंधुदुर्गच्या पहिल्या महिला अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचा सिंधुदुर्ग भाजप महिला मोर्चातर्फे भव्य सत्कार!

सिंधुदुर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अप्पर पोलीस अधीक्षकपदी विराजमान झालेल्या श्रीमती नयोमी साटम यांचा सिंधुदुर्ग भाजप महिला मोर्चाच्या वतीने नुकताच पुष्पगुच्छ आणि चाफ्याचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. प्रज्ञा धवन आणि जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर यांच्या शुभहस्ते पार पडला.

विशेष म्हणजे, नयोमी साटम मॅडम या आपल्या कणकवली तालुक्यातील पिसेकामते, फणसवाडी येथील मूळ रहिवासी आहेत, ही बाब सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. आपल्या मातीतील कन्या इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या पदावर पोहोचल्याने महिला सक्षमीकरणाला मोठा वाव मिळाला आहे.

या सत्कारप्रसंगी भाजपच्या अनेक प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यामध्ये जिल्हा पदाधिकारी सौ. मेघा गांगण, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ. सावी लोके, वैभववाडी महिला मंडल अध्यक्ष सौ. प्राची तावडे, कुडाळ महिला मंडल अध्यक्ष सौ. आरती पाटील, ओरोस महिला मंडल अध्यक्ष सौ. सुप्रिया वालावलकर, वेंगुर्ला महिला मंडल अध्यक्ष सौ. सुजाता पडवळ, सावंतवाडी महिला मंडल शहर अध्यक्ष सौ. मोहिनी मडगावकर, कणकवली ग्रामीण महिला मंडल अध्यक्ष सौ. हर्षदा वाळके, आणि कुडाळ तालुका सदस्य सौ. साधना मांडिये यांचा समावेश होता.

नयोमी साटम मॅडम यांच्या कर्तव्यनिष्ठेला आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस सिंधुदुर्ग भाजप महिला मोर्चाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या या यशाने जिल्ह्यातील अनेक महिलांना प्रेरणा मिळेल अशी आशा आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles