सावंतवाडी : शहरातील मिलाग्रीस हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कुमार संस्कार जगदीश राऊळ याने शहरी सर्वसाधारण मध्ये 212 गुण मिळवून सतरावा क्रमांक मिळविला. शमिका संजय शेवाळे हिने शहरी सर्वसाधारण मध्ये 192 गुण मिळवून 39 वा क्रमांक तर कुमार निलराज निलेश सावंत याने शहरी सर्वसाधारण मध्ये 186 गुण मिळवत 45 वा क्रमांक प्राप्त केला आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे प्रशाला मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदाना, पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग यातून अभिनंदन होत आहे.
मिलाग्रीस हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा ! ; ‘हे’ तीन शिलेदार शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकले.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


