सावंतवाडी : ग्रामीण भागातील विद्यार्थांना अद्यावत तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे,या उद्देशाने कारिवडे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे.ग्रामपंचायतीतर्फे कारिवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.१ ला एक संगणक भेट देण्यात आला. तसेच शैक्षणिक साहित्य वह्या,कंपास,व सेमी इंग्रजी पुस्तके वाटप करण्यात आले. आजच्या युगात विद्यार्थ्यांना लहान पणापासुनच संगणक व इंटरनेटचे ज्ञान असणे आवश्यक आहे हे लक्षात घेवुन तसेच संगणकाच्या सहाय्याने विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासक्रम पुर्ण करु शकतात तसेच विविध उपक्रम राबवु शकतात ही गरज ओळखुन कारिवडे ग्रामपंचायतीने महत्वाचे पाऊल उचलले आहे.आजच्या युगात मराठी शाळेत सेमी इंग्रजी नसल्यामुळे विद्यार्थी शहराच्या ठिकाणी शाळेत जातात यामुळे गावातील शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होते त्यामुळे विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी शिक्षण मिळावे या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायत कारिवडेचे लक्ष वेधले. या विषयावर सरपंच मा.सौ.आरती अशोक माळकर,ग्रा.प.सदस्य श्री.महेश गांवकर,सामाजिक कार्यकर्ते श्री.अशोक माळकर यांनी तात्काळ दखल घेवुन सेमी इंग्रजी गणित विषयाची पुस्तके शाळेला भेट दिली व शाळेत सेमी इंग्रजी शिक्षण सुरु केले. ,तसेच वह्या व कंपास वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत कारिवडेच्या या महत्वपुर्ण योगदानाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक व ग्रामस्थांनी कारिवडे ग्रामपंचायतीचे विशेष आभार मानले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे एक लक्षवेधी पाऊल आहे.
यावेळी सरपंच मा.सौ.आरती अशोक माळकर,ग्रा.प.सदस्य श्री.महेश गांवकर,ग्रा.प.सदस्या सौ.प्रतिभा जाधव,पोलिस पाटील श्री.प्रदिप केळुसकर, सामाजिक कार्यकर्ते भा.ज.पा.उपाध्यक्ष आंबोली मंडळ श्री.अशोक माळकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.अमोल कारिवडेकर,शाळा व्यवस्थापन समिति उपाध्यक्ष श्री.सावंत,माजी शाळा व्यवस्थापन समिति माजी अध्यक्ष श्री.उमेश(बाळा ) गांवकर,श्री.सिध्देश गोसावी ग्रा.प.कर्मचारी, महिला ग्रामस्थ सौ.भार्गवी नाईक ,सौ.मानसी सावंत,व इतर पालक, शिक्षक उपस्थित होते.मुख्याध्यापिका सौ.पास्ते मॅडम यांनी सुत्रसंचलन केले व आंबोलकर सर यांनी आभार मानले.
कारिवडे ग्रामपंचायतीचा ‘लई भारी’ उपक्रम. ! ; शाळा नंबर १ ला संगणक भेट अन् शैक्षणिक साहित्य वाटप.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


