Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

अभिनंदनीय ! – कवी विठ्ठल कदम यांच्या ‘चिमणकथा’ बालकथा संग्रहाची ‘SCERT’च्या वतीने अभ्यासक्रमात निवड.

सावंतवाडी : शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेच्या वतीने शिक्षक लेखकांसाठी लेखन कार्यशाळा आयोजित करून शालेय विद्यार्थ्यांना अवांतर वाचनात रुची निर्माण करण्यासाठी शासनामार्फत ग्रंथ निर्मिती उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमात कुणकेरी शाळा नंबर 1 चे उच्चश्रेणी मुख्याध्यापक विठ्ठल नारायण कदम यांचा ‘चिमणकथा’ हा बाल्याच्या भावविश्वावर आधारित 40 बालकथा कथासंग्रह शासनाच्या वतीने निर्माण करण्यात आला आहे. हा ग्रंथ महाराष्ट्रातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या ग्रंथालयात दाखल झाला असून महाराष्ट्रातील शिक्षक व विद्यार्थी वर्गाने स्वागत केले आहे. ‘चिमणकथा’ या पुस्तकात चिमण हा मुलगा नायक असून त्याच्या भोवतालचे जग आणि त्याचे निरीक्षणे नोंदवणारा चिमण हा मुलगा पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांशी संवाद साधताना दिसतो. विठ्ठल कदम यांचा यापूर्वीही एकदा काय झाले? कथासंग्रह, चार पावलं दूर बालकादंबरी व तुझा पदर तिरंगा हे बालसाहित्य प्रकाशित असून ‘रुमणी’ हा काव्यसंग्रह साहित्य प्रांतात गाजलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मनोहर परब व रामजी पोळजी यांचीही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. विठ्ठल कदम हे महाराष्ट्र शासनाच्या साहित्यिक व सांस्कृतिक मंडळावर सदस्य असून नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles