सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन जिल्हा चिटणीस या पदावर कार्यरत असताना एकनाथ नाडकर्णी यांच्यावर पक्ष शिस्तीच्या विरोधात काम सुरू ठेवल्याने तत्कालीन परिस्थितीनुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान त्यांनी आपण ज्येष्ठ पदाधिकारी असून याबाबत पक्षाकडे निलंबन रद्द करण्यासाठी विनंती केली होती. त्यांच्या या विनंती अर्जाचा पक्षाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांचे निलंबन पक्षाने रद्द केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी याबाबत एकनाथ नाडकर्णी यांना भारतीय जनता पार्टीच्या पक्ष वाढीसाठी योगदान देणार या अपेक्षेने त्यांचे निलंबन रद्द करून जोमाने काम करण्याचे जिल्हाध्यक्ष या नात्याने आदेश दिले आहेत. तसे पत्र देखील त्यांनी एकनाथ अनंत नाडकर्णी यांना पाठविले आहे.
Big Breaking – एकनाथ नाडकर्णी यांचे भाजपमधून निलंबन रद्द! ; जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पक्ष कार्यात सहभागी होण्यासाठी दिल्या सूचना.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


