सावंतवाडी : स्टेम लर्निंग मुंबई,63 मुन्स टेक्नॉलॉजी आणि ट्रिंकर लॅब यांच्याद्वारे आयोजित *नॅशनल स्टेम चॅलेंज* या सायन्स अँड मॅथ्स मॉडेल मेकिंग आणि टेक इंजिनियरिंग ट्रिंकरिंग (रोबोटिक सायन्स) या जिल्हास्तरीय स्पर्धेत माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली गटाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून मुंबई येथील विभागीय स्पर्धेसाठी या गटाची निवड झाली आहे. विजेत्या गटात चैतन्या मिलिंद गावकर,अथर्व नारायण मोर्ये, कौस्तुभ विष्णू नाईक या विद्यार्थ्यांनी “टच बेस सेन्सर” हे उपकरण तयार करुन त्याचे दर्जेदार सादरीकरण केले. त्यांना विद्यालयाचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक पांडुरंग काकतकर यांचे मार्गदर्शन लाभले.

श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्ली संचलित माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली विद्यालयाच्या अद्ययावत मिनी सायन्स सेंटरमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली.सदर स्पर्धेसाठी जिल्ह्यातील स्टेम लर्निगद्वारा स्थापित मिनी सायन्स सेंटर असलेल्या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे नियोजन व परीक्षण स्टेम लर्निग मुंबईचे सायन्स ट्रेनर गौरव पाटील व पुणेचे ट्रिंकर ट्रेनर प्रमोद भामरे यांनी केले. केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर व रामचंद्र वालावलकर यांनी यास्पर्धेस सदिच्छा भेट देत सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शिक्षण विभागातर्फे शुभेच्छा दिल्या.
यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक पांडुरंग काकतकर तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेच्या यशस्वी नियोजनाबद्दल मुख्याध्यापक अरुण तेरसे,ज्येष्ठ शिक्षक नितीन गवंडळकर, प्रदीप सावंत,शिक्षकेतर कर्मचारी श्रीराम नाईक, राजेंद्र गावकर, संतोष ओटवणेकर, संदीप जाधव, बापू निर्गुण यांचे देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्ली संस्थेतर्फे अभिनंदन करण्यात आले.
63 मुन्स टेक्नॉलॉजी, स्टेम लर्निंग मुंबईच्या सीएसआर फंडातून सोनुर्ली विद्यालयात उभारलेल्या या मिनी सायन्स सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून ग्रामीण भागात विज्ञानाचा प्रचार ,प्रसार होत असून अपूर्व विज्ञान मेळावा,विज्ञान जत्रा, सायन्स फेअर,व्हर्चुअल रियालिटी, विज्ञान नाट्य महोत्सव,मिशन रेबीज,विज्ञान प्रदर्शन,प्रश्न मंजुषा,
ई-लर्निंग,सायन्स सिम्पोजियम, फील्ड व्हीजीट, स्किल डेव्हलपमेंट,करिअर गाईडन्स यासारख्या विविध उपक्रम व स्पर्धां आयोजनातून या विद्यालयाबरोबरच परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
ज्ञान प्रबोधिनी पुणेच्या सहकार्याने विद्यालयात जिल्ह्यातील पहिली व्हर्चुअल रिॲलिटी लॅब बनविली असून येथे विद्यार्थ्यांना आभासी प्रयोग घेतले जातात.आजतागायत अगस्त्या फाउंडेशन कुप्पम (आंध्रप्रदेश),राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व जि.प.सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांनाही अनेकवेळा कृतीयुक्त प्रशिक्षणे आयोजित केली आहेत. या सर्व उपक्रमांची दखल विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारने घेऊन विद्यालयाचे शिक्षक पांडुरंग काकतकर यांची कोलकाता, बेंगलोर, तिरुवनंतपुरम,फरीदाबाद, भोपाळ,गुवाहाटी येथील इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलला निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या या विद्यालयातील मिनी सायन्स सेंटरची उत्कृष्ट कामगिरी तसेच विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल जिल्हा शिक्षणाधिकारी कविता शिंपी, डाएटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी गौरवोदगार काढले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्लीचे अध्यक्ष दिगंबर मोर्ये, उपाध्यक्ष आनंद नाईक, सचिव नारायण मोर्ये, सहसचिव नागेश गावकर, खजिनदार भारती गावकर,संचालक शंकर गावकर, शालेय समिती अध्यक्ष तथा संचालक आनंदी गावकर, भरत गावकर,शरद धाऊसकर, गोविंद धडाम, लक्ष्मीदास ठाकूर,दिपक नाईक, मुकुंद परब,उदय गाड ,भूषण ओटवणेकर,तेजस गावकर, महेश राऊळ,सल्लागार गोविंद मोर्ये यांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले.


