Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

JOBS – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना नोकरीची संधी.!

सिंधुदुर्ग : रेडीज फाउंडेशन मुंबई व जिल्हा दिव्यांगपु नर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५/०७/२०२५ रोजी १० ते २ या वेळेत वागदे गोपुरी आश्रम ता. कणकवली येथे रोजगार मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यामध्ये मालवण,देवगड, वैभववाडी,कणकवली, या तालुक्यांसाठी हा मेळावा आहे. तसेच कुडाळ,सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग या तालुक्यातील दिव्यांग उमेदवारांसाठी दिनांक २६/०७/२०२५ रोजी नेत्र रुग्णालय भटवाडी न्याप संस्था पहिला मजला सावंतवाडी,येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.पात्रता १०वी ते पदवीधर व इतर पुणे, मुंबई, व गोवा येथे नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्ण संधी. वयाची अट १८ ते ३५ वर्षे.

अस्थिव्यंग,अंध, अल्पदृष्टी अंध, मूकबधीर, कर्णबधीर,मतिमंद, व इतर ४०% पेक्षा जास्त असावे.संबंधित रेडीज फाउंडेशनचे अधिकारी उपस्थित दिव्यांग बांधवांचे इंटरव्ह्यू घेऊन निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नोकरी उपलब्ध करून देणार आहेत. इच्छुक दिव्यांग उमेदवार संबंधित संस्था, संघटना, दिव्यांग व त्यांचे पालक यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन डॉ. रेडीज फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क – 
– गौतम काळे : ८८०५२८८८३०
– अनिल शिंगाडे सर: ९७६५९७९४५०
ऑफीस नं. : ९६२३६५५१४२
DDRC OROS : 9322073992

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles