सावंतवाडी : आपल्या देशात दर वर्षी २९ ऑगस्ट हा दिवस भारतीय हॉकीतील दिग्गज खेळाडू आणि जादुगार मेजर ध्यानचंद यांची जयंती ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर जुनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला.
सदर प्रसंगी शाळेतील विविध खेळातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचा गौरव करून यथोचित सन्मान करण्यात आला. सदर प्रसंगी प्राचार्य नंदकिशोर नाईक, उपप्राचार्य प्रदीप देसाई, सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिकेत सावंत, क्रीडा शिक्षिका सुमेधा सावळ.
यावेळी विविध खेळांच्या माध्यमातून कशा प्रकारे नवनवीन संधी उपलब्ध आहेत व त्याचा भविष्यात चांगले करिअर घडविण्यासाठी कसा फायदा करून घेता येईल?, यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



