ठाणे : कळवा येथील रायझिंग स्टार प्रि.प्रायमरी स्कूलच्या अत्यंत उपक्रमशील प्रिन्सिपल ममता मसूरकर यांना त्यांच्या सातत्याने सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रातील अभिनव कामगिरीबद्दल इंडियन एज्युकेशन टॅलेंट अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय जीवन भरारी संमेलन नुकतेच ठाणे येथील ग्रंथ भंडार येथे संपन्न झाले. यावेळी उपक्रमशील प्रिन्सिपल व सामाजिक कार्यकर्ता तसेच सातत्याने विविध सामाजिक विषयांवर आवाज उठवत आपल्या अभिनव कामगिरीने जनसेवेचे व्रत घेतलेल्या ममता मसूरकर यांना प्रा.डाॅ. बी. एन. खरात (संचालक समृध्दी प्रकाशन नॅशनल टॅलेंट बुक वुमन रेकॉर्ड), सुप्रसिद्ध मराठी अभिनेता शेखर फडके, राष्ट्रपती शौर्य पदक विजेते अग्निशामक दल तुकाराम पाटील, तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भूपेंद्र संखे आदि मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल व श्रीफळ अशा भव्य स्वरूपात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

वनिता फाउंडेशन मुंबई, नॅशनल टॅलेंट बुक ऑफ ह्यूमन रेकॉर्ड, तसेच सम्यक वैद्यकीय व शिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य अशा पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच ठाणे येथील ग्रंथ भंडार येथे करण्यात आले.
आपल्या जीवनशैलीत हक्कासाठी, ध्येयासाठी आणि राष्ट्र विकासाच्या उन्नतीसाठी सतत धडपडत असणाऱ्या ममता मसुरकर यांना एक कृतज्ञता म्हणून या संमेलनात उल्लेखनीय कार्याच्या गौरवार्थ ममता मसूरकर मॅडम यांना इंडियन एज्युकेशन टॅलेंट अवॉर्ड या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या विविध योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
ममता मसूरकर यांचे हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.


