सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच उबाठा पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेत्ये शाळेत सर्व मुलांना व अंगणवाडीतील मुलांना शालेय वस्तू देण्यात आल्या तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, सावंतवाडी तालुका प्रमुख मायकल डिसोजा, माजी जिल्हाप्रमुख रमेश गांवकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, उपसरपंच बाळू गावडे, माजगाव विभाग प्रमुख सुनील गावडे, संतोष गावडे, शरद जाधव, पोलीस पाटील रमेश जाधव, हनुमंत गावडे, शालेय समिती अध्यक्षा सायली गांवकर, अजय पाटकर, उत्तम गावडे आदी उपस्थित होते.


