सावंतवाडी : तालुक्यातील कलंबिस्त इंग्लिश स्कूल,कलंबिस्त मध्ये रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.रानभाज्यांचे आहारातील महत्त्व लक्षात घेऊन या रानभाज्यांबद्दल जनजागृती व्हावी, विविध रानभाज्यांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन कलंबिस्त पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर अनिकेत सावंत, पत्रकार तथा पालक रवींद्र तावडे, प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, वरीष्ठ लिपिक विष्णू पास्ते,टपाल कर्मचारी मेस्त्री, पालक शिक्षक संघ सदस्या दीपश्री जाधव, ग्राम पंचायत सदस्या सुप्रिया राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या महोत्सवात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी टाकळा,अळू, अळूवडीची पाने,सुरण पाला,चिवा(बांबू) कोंब, पेवा,कुरडू, शेवगा, भारंगी,गवती चहा, हळदीची पाने, कडीपत्ता, केळफूल,भाजीची केळी,गावठी लिंबू,कच्ची पपई,कोथिंबीर, कोकम,भोपळ्याची पाने आदी परीसरातील विविध प्रकारच्या भाज्या आणल्या व त्यांचे प्रदर्शन मांडून विक्रीही केली. काही विद्यार्थ्यांनी या रानभाज्यांचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. या महोत्सवास संस्था सदस्य सूर्यकांत राजगे,माजी विद्यार्थी संजीव पालकर, महेश पास्ते, अंकुश सांगेल कर तसेच बहुसंख्य पालकांनी भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक करुन त्यांना प्रोत्साहन दिले. महोत्सव यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी केले तर मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी सहकार्याबद्दल पालकांचे व उपस्थितांचे आभार मानले.
कलंबिस्त हायस्कूलमध्ये रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


