कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत निसर्गातील दुर्मिळ अशा रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री असा भव्य उपक्रम साजरा करण्यात आला या प्रदर्शनाचे उद्गाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू व विश्वस्तअनिलपंत डेगवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी निसर्गनिर्मित रानभाज्या व मानवी आरोग्य या विषयी मार्गदर्शन केले.

पर्यवेक्षक अच्यूतराव वणवे सरांनी रान भाज्यांची ओळख करून दिली. विज्ञान शिक्षिका सौ. शर्मिला केळूसकर मॅडम यांनी रान भाज्यांचे शास्त्रीय महत्व या विषयी मार्गदर्शन केले. प्रशालेतील सर्व विद्यार्थांसाठी प्रदर्शन खुले ठेवण्यात आले. यावेळी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक जनार्दन शेळके, प्रसाद राणे, सौ सावंत मॅडम, अमोल शेळके, संदीप कदम आदि उपस्थित होते. प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.


