सावंतवाडी : तालुक्यातील बांदा येथील व्ही. एन. नाबर स्कूलमध्ये ‘कारगिल विजय दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते मशाल पेटवून शहिद स्मारकास रीत चढवून हुताम्याना वंदन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॅप्टन शंकर भाईप लाभले तर किरण सावंत हे प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
जवान आपल्या देशाच्या रक्षणासाठी कसा बलिदान करत असतो?, याबद्दल माहिती किरण सावंत यांनी दिली तर आर्मीमधील करिअर कसं असतं? याबद्दल माहिती श्री. भाईप यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मनाली देसाई यांनी केले तर सूत्रसंचालन स्नेहा नाईक यांनी केले. आभार सुप्रिया पाटील यांनी मानले.


