Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

कारगिल विजय दिनानिमित्त वेंगुर्लेत भाजपचा माजी सैनिकांना सलाम ! ; प्रत्यक्ष घरी जाऊन माजी सैनिकांचा केला सत्कार!

वेंगुर्ला : देशाच्या शुर सैनिकांच्या शौर्याचे , पराक्रमाचे आणि बलिदानाचे प्रतिक म्हणुन कारगिल विजय दिन साजरा केला जातो. कारगिल विजय दिवस स्वतंत्र भारताच्या प्रत्येक देशवासीयांसाठी महत्वपूर्ण आहे. म्हणूनच या दिवशी शहीद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांना अभिवादन केले जाते. तसेच त्यांच्या देशसेवेचा गौरव केला जातो . भाजपा च्या वतिने वेंगुर्लेत दरवर्षी कारगिल विजय दिनाच्या औचित्याने माजी सैनिकांच्या घरी जाऊन सन्मान करण्यात येतो .
सर्वप्रथम उभादांडा गावातील माजी सैनिक रामचंद्र मुणगेकर यांचा सत्कार भाजपा ओबीसी सेलचे रमेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर ,आनंद मेस्त्री – शक्ती केंद्र प्रमुख , देवेंद्र डिचोलकर – माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य , दादा तांडेल बुथ प्रमुख : 62 , बबी साळगावकर बुथ प्रमुख , मानसी साळगावकर ग्रामपंचायत सदस्य व बुथ प्रमुखः 61, शितल नाईक , र्किती कारेकर दिव्या कुबल उपस्थित होते.

 
तद्नंतर मठ – कणकेवाडी येथील माजी सैनिक देवेंद्र लक्ष्मण गावडे व आनंद टीलु गावडे यांचा सत्कार मठ सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर व सुहास गवंडळकर यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी उपसरपंच संतोष वायंगणकर , ता.का.का.सदस्य रविंद्र खानोलकर , युवा नेते अजित नाईक , व्हा.चेअरमन सिताराम गावडे , विजय आंबेरकर , लक्ष्मण दे.गावडे उपस्थित होते .
या सत्कार प्रसंगी बोलताना प्रसंन्ना देसाई म्हणाले कि भारतामध्ये दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. १९९९ मधील कारगिल युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. कारगिल युद्धादरम्यान भारतीय सैन्याने “ऑपरेशन विजय” या मोहिमेद्वारे पाकिस्तानच्या घुसखोरांना भारतीय भूभागातून हुसकावून लावले. कारगिलच्या खडतर डोंगराळ भागात भारतीय सैनिकांनी शौर्याने लढत शत्रूच्या ताब्यातील पोस्ट पुन्हा जिंकल्या. २६ जुलै १९९९ रोजी दीर्घ आणि प्रखर लढाईनंतर भारताने त्या पोस्टवर तिरंगा फडकवला आणि तेव्हापासून हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

कारगिल युद्धाची सुरुवात मे १९९९ मध्ये झाली, जेव्हा पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांनी गुपचूप भारतीय भूभागात घुसखोरी करून नियंत्रणरेषा (LoC) ओलांडली आणि द्रास व कारगिल भागातील महत्त्वाच्या ठिकाणी ताबा मिळवला. हे लक्षात येताच भारतीय सैन्याने “ऑपरेशन विजय” राबवून त्या जागा पुन्हा मिळवण्यासाठी मोहिम सुरू केली. भारतीय सैन्याने भारतीय हवाई दलाच्या मदतीने १८,००० फूट उंचीवरील अत्यंत कठीण परिस्थितीत दिवस-रात्र लढून विजय मिळवला.

या युद्धात भारताचे ५०० हून अधिक शूर सैनिक हुतात्मा झाले. संपूर्ण देश त्यांचे बलिदान व शौर्य अभिमानाने स्मरतो आणि त्यांना वंदन करतो. दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल युद्धातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानित केले जाते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles