✍️ प्रा. रुपेश पाटील✍️
सावंतवाडी : असं म्हणतात की, आज पृथ्वीतलावर रोज हजारो माणसं जन्माला येतात आणि हजारो हे सुंदर जग सोडूनही जातात. पण आपण गेल्यानंतर त्यांचंच नाव पाठीमागे राहतं, जे स्वतः जगत असताना आपल्या जगण्यातून इतरांना सुख, आनंद आणि शाश्वत विकासात्मक काहीतरी देऊन जातात.
आपण किती जगलो?, यापेक्षा आपण कसं जगलो? आणि कोणासाठी जगलो?, याला महत्त्व देणारे आणि खऱ्या अर्थाने अल्पावधीतच तळकोकणातील सावंतवाडी तालुक्यामध्ये सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे, युवकांच्या मनातील आश्वासक चेहरा, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सच्चे शिलेदार, संदीप एकनाथ गावडे..!

मित्रहो, स्वामी विवेकानंद जसं म्हणतात की युवक असा असावा – ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियांवर संयम आहे,
मन ज्याचे स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचे बळ आहे, सिंहासारखा निर्भय आहे, ध्येय ज्याचे उच्च आहे, सत्य जाचा ईश्वर आहे, व्यसनांपासून जो मुक्त आहे, जीवनामध्ये शिस्त आहे, प्रेमळ ज्याचा सूर आहे, मानवता हेच ज्याचं कुळ आहे, गुरुजनांचा आदर आहे, पालकांवरती श्रद्धा आहे, दीनदुबळ्यांचा मित्र आहे, सेवेसाठी तत्पर आहे, देवावर आणि देशावर भक्ती आहे. जीवनामध्ये नीती आहे, चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे, तोच खरा आदर्श युवक..! आणि ही युवकाची व्याख्या तंतोतंत जपली आहे ती युवाईचे आयडॉल – संदीप गावडे यांनी.
खरंतर आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल किती आणि काय लिहावं? हा प्रश्न होता.
मात्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने समाजहितासाठी अहोरात्र झटणारा, विकासाचा ध्यास आणि या लाल मातीतल्या प्रत्येकाचा विश्वास जपून, आपल्या भाजपा ह्या जगातील सर्वांत मोठ्या पक्षाच्या ध्येय धोरणांना निष्ठेने जपणारा, हा युवा मनाचा आश्वासक चेहरा नेहमीच इतरांपेक्षा वेगळा वाटतो.
आपल्या बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास असणारा आणि तेवढाच अत्यंत निरीक्षणात्मक अभ्यास असणारा एक दुर्मिळ नेता म्हणजे संदीप एकनाथ गावडे.
आपल्या सतत उपक्रमशील उपक्रमांनी सर्वसामान्य जनतेला आपला हक्काचा माणूस वाटणारं हे नेतृत्व सावंतवाडी तालुक्यातील फणसवडे या छोट्याशा गावात जन्म घेऊन डोंबिवलीसारख्या महानगरीत उच्च शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. एमबीए (फायनान्स) ही उच्च विद्या संपादित करून त्यांनी काही काळ तेथेच काम केले. मात्र आपल्या आई-बाबांचा समाजसेवा या व्रताचा वारसा घेऊन आणि आपले मामा व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत गावडे यांच्याकडून राजकीय धडे घेऊन त्यांनी आपला प्रवास सुरू केला.
याचदरम्यान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व तत्कालीन कॅबिनेट मंत्री आणि ‘डोंबिवली पॅटर्न’ म्हणून ज्यांचा आदर्श अनेक आमदार आणि मंत्री घेत आहेत असे उपक्रमशील आमदार रवींद्र चव्हाण यांच्या ते संपर्कात आले.
श्री. चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी सक्रियपणे राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र केवळ राजकारण न करता समाजकारणात त्यांनी अधिक लक्ष दिले आणि म्हणूनच आज ते युवा मनाचे सच्चे आयडॉल ठरत आहेत.
संदीप गावडे – सातत्यपूर्ण आणि विविधपूर्ण उपक्रमशील राबविणारे व्यक्तिमत्व –
आजच्या घडीला राजकारण अत्यंत वेगळ्या पद्धतीने सुरू असले तरी कधीही कुणाला कमी न लेखता, कधीही कुणावर टीका वा टिपणी न करता, केवळ आपल्या अंगी असलेले नेतृत्व गुण आणि कर्तृत्व क्षमता याच्या जोरावर संदीप गावडे यांनी अत्यंत वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून युवा, वृद्ध, महिला तसेच विद्यार्थी आणि शिक्षक या सर्वांचीच मनं जिंकली आहेत. सर्वांना त्यांच्या वागण्याने आपल्याकडे आकर्षित केले आहे.


समाजाचा विकास करत असताना त्यांनी नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य, आध्यात्मिक अशा सर्व अंगांना स्पर्श करीत उपक्रमांचा धडाका लावला. हे सर्व लोकोपयोगी उपक्रम राबवत असताना त्यांनी आपल्या पक्षाची मनं सुद्धा जिंकली आणि आपले आयडॉल रवींद्र चव्हाण यांचा विश्वासही.

आज सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या विकसित होत असताना कावळेसाद पॉईंटसारख्या अत्यंत मनमोहक स्थळाला त्यांनी ‘पर्यटन स्थळ’ म्हणून एक वेगळी झळाळी दिली आहे. भविष्यात जागतिक स्तरावर त्याची नोंद होईल, यात शंका नाही.
आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि शाळांसाठी त्यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. अगदी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा, यशवंत गुणवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा, जनसामान्य नागरिकांसाठी आरोग्य व रक्तदान शिबिरे आणि विशेष म्हणजे कोरोनासारख्या महामारीत त्यांनी राबविलेले महत्त्वपूर्ण उपक्रम आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे केलेले वाटप या सर्वच उपक्रमांनी समाज माध्यमे आणि समाजातील प्रत्येक स्तरावरील माणसांची युवा नेते संदीप गावडे यांनी मने जिंकली.

चौकुळ, गेळे, आंबोली, दाणोली, फणसवडे अशा अनेक ग्रामीण भागातील रस्ते, स्ट्रीट लाईट व शाळांना सोलर पॅनेल अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे संदीप गावडे हे नाव जनमाणसांच्या मनामध्ये आपसूकचं कोरले गेले आहे.
आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आयडॉल मानणारे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांना गुरू मानून त्यांच्या मार्गदर्शनाने काम करणारे संदीप गावडे हे युवा नेतृत्व ग्रामीण व शहरी अशा दोन्ही स्तरांवर सातत्याने विकासाची कास धरून आपले कार्यकर्तृत्व गाजवत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल दस्तरखुद्द प्रदेशाध्यक्ष आणि त्यांचे गुरु भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी देखील अनेकदा घेतली आहे. आणि म्हणूनच, *”संदीप तू फक्त असंच काम करत राहा, फक्त नि काम करत राहा. तुझी योग्य ती दखल नक्की घेतली जाईल.!”* असा मूलमंत्र त्यांनी दिला आहे. आपल्या या गुरूचा मूलमंत्र घेऊन जनमानसांच्या विकासाच्या दूरदृष्टीकोनातून झटणाऱ्या या युवा आयडॉल व्यक्तिमत्वास आज वाढदिवसानिमित्त आमच्या ‘टीम सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज’कडून हृदयापासून शुभेच्छा…!
आदरणीय संदीपजी..,
आपलं जीवन प्रेम आणि सुखाने भरलेलं असावं, तुमच्या चेहऱ्यावर हसणं कायम असावं,
तुम्ही जितके खास आहात, तितकाच तुमचा जन्मदिनही,
प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी आणि निरामय आनंद घेऊन येवो.,
आकाशातील प्रत्येक तारा तुमच्या जीवनात उज्ज्वलता आणो, आणि तुम्ही सदैव आनंदात आणि समृद्धीत राहा.!
वाढदिवसाच्या हृदयपूर्वक शुभेच्छा!


