तळवडे : गुरूवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे प्रशालेत शिक्षक – पालक – विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले सावंतवाडी येथील निसर्गप्रेमी व सर्पमित्र नावेद हेरेकर यांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
“सुजाण पालकत्वातूनच उद्याचं उज्वल भविष्य आकार घेत पाल्यांना स्वयंशिस्त लावणे ही काळाची गरज आहे आपले पालक हेच आपले रियल हिरो आहेत ” असे प्रतिपादन श्री. हेरेकर यांनी यावेळी केले. मोबाईलच्या अतिवापराचे विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम आणि त्यासाठी संभाव्य उपाय यावर देखील त्यांनी भाष्य केले.
या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित, अष्टपैलू व्यक्तिमत्व, अनेक मॅरेथॉन स्पर्धांचे विजेतेपद पटकावणारा कु. कबीर हेरेकर याचा प्रशालेच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्रशालेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मैथिली मनोज नाईक यांनी देखील पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अजय बांदेकर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.


