सावंतवाडी : दिनांक 28 जुलै 2025 रोजी जि. प .प्राथ. शाळा माजगाव नं .5 येथे विविध स्पर्धेतील तसेच STS , BDS स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना शै. साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी माजी शा . व्य. स. अध्यक्षा श्रीम. शितल निचम यांचा सत्कार करण्यात आला.तसेच नूतन अध्यक्षा श्रीम. समिक्षा गावडे यांचे ही अभिनंदन करण्यात आले.

श्री. अशोक धुरी यांनी विद्यार्थ्यांना शै. साहित्य व खाऊ वाटप केले. सर्व उपस्थित सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . ॲड . पवित्रा धुरी यांनी विद्यार्थी सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले.


