सावंतवाडी : निरवडे येथील एका खाजगी हायस्कूलचे निवृत्त इंग्रजीचे शिक्षक विश्वकांत गणपत तारी (वय ७१) हे चार दिवसापूर्वी बाजारात फिट येऊन पडले होते त्यावेळी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं परंतु आता त्यांची तब्येत दिवसान दिवस खालावत चालली आहे त्यांना बेडवरून उठता देखील येत नाही तीन दिवस त्यांनी काहीच खाल्लं नाही. त्यांचा डावा हात- पाय पूर्णपणे लुळा पडला आहे मेंदूला रक्तपुरवठा होत नाही त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना अधिक उपचारासाठी काल रात्री 11 वाजता सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व लक्ष्मण कदम यांच्या सहकार्याने 108 रुग्णवाहिकेने ओरोस जिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं.
अद्यापही त्यांच्या नातेवाईकांचा पत्ता लागला नाही त्यामुळे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला त्यांची जबाबदारी स्वीकारावी लागली आहे.
‘त्या’ निराधार सेवानिवृत्त शिक्षकाची तब्येत खालावली! ; सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात केले दाखल.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


