सावंतवाडी : ” ग्राहक हा राजा आहे” असे विधान भारताच्या संसदेत माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधीं यांनी काढले होते. १९८६ मध्ये जेव्हा ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक संरक्षण कायदा संमत करण्यात आला तेव्हा संबोधित करताना माजी पंतप्रधान म्हणाले होते, ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळाली पाहिजे त्यांची फसवणूक होता नये. यासाठी हा ऐतिहासिक कायदा आपण संमत करत आहोत. माञ आज हा ग्राहकांच्या संरक्षणासाठी केलेला कायदा होवून जवळपास चाळीस वर्षे झाली तरी ग्राहकांची फसवणूक थांबलेली नाही, याऊलट आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरूपयोग करून ग्राहक लुबाडले जात आहेत.
खाजगी असो वा सरकारी किंवा शासन नियंत्रित अनेक व्यवस्थापनात ग्राहकांना या मनस्तापाला सामोरे जावे लागते. महाराष्ट्र विज वितरण कंपनी तर ग्राहकांना नेहमीच चुना लावता. वीज भाडे आकारणी करताना अनेक हेडखाली छुपे चार्जीस लावून वीज ग्राहकांना मोठा भुर्दंड पडत आहे आता तर असा नवीन कायदा केला आहे की, जर दोन महिने विज देअके उशिरा भरली तर विज वितरण कंपनीकडे जी आपली अनामत रक्कम असेल त्यातून वसुली दंडासह केली जाईल. वीज ही प्राथमिक गरज असल्याने ग्राहक मुकाट्याने वीज बिलाचा भरणा करतात. वीज नियामक मंडळाने केलेले कायदे हे फक्त कागदावरच असतात. त्याची कटाक्षाने अमंलबजावणी होताना दिसत नाही. कमी दाबाने व खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. फक्त भरमसाठ येणारी वीज देअके ग्राहकांनी भरायची आणि सेवेच्या नावाने कायमची बोंब.
एअरटेल, व्होडाफोन, जिओ किंवा बीएसएनएल या कंपन्यांनी तर ग्राहकांना हैराणच केलेले आहे. नेटवर्कच्या नावाने बोंब फक्त आपल्या कंपनीचा फायदा कसा होईल यासाठी मार्केटिंगच्या निरनिराळ्या क्लुप्त्या काढून ग्राहकांची लुट सुरु आहे.
बॅंकांनी तर एक पाऊल पुढे टाकलेले आहे. ग्राहक हे देवता नाही तर पिडाच आहे अशा अविर्भावात कर्मचारी ग्राहकांशी वागत असतात. मेसेज चार्जिंस किंवा कमीत कमी खात्यात शिल्लक ठेवली नाही तर दंडाच्या स्वरूपात केल्या जाणाऱ्या लुटीचा संपूर्ण भारतातील आकडा हा तब्बल नऊ हजार कोटींचा आहे.
रेल्वे, परिवहन महामंडळ असो किंवा इतर उपक्रम या सगळ्या ठिकाणी ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेच्या नावाने बोंबच आहे. रोड टॅक्सच्या माध्यमातून शासन हजारो कोंटी वसूल करते पण त्याबदल्यात चांगले रस्ते दिले पाहिजेत. याबाबत गांभीर्याने विचार होत नाही.
लोकांच्या जीवनाशी खेळला जाणारा दुसरा अतिशय गंभीर प्रकार म्हणजे दुधासारख्या आवश्यक घटकांमध्ये होणारी भेसळ, रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवली जाणारी फळे याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे आवश्यक पुरेसा कर्मचारी नसल्याने अशी भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर किंवा विक्रेत्यांकडून कायदेशीर कारवाई करण्याच्या मर्यादा आहेत. त्यामुळे आरोग्यला अपायकारक असणाऱ्या वस्तू ग्राहकांना घ्याव्या लागतात.
ग्राहकांची सगळीकडून लुटमार होत असून ग्राहक ही देवता आहे, राजा आहे हे शब्द वापरुन गुळगुळीत झाले असून ग्राहक हा अगतिक आहे.
“सगळ्यांकडूनच लुटालुट, सेवेच्या नावाने मात्र बोंब !” – ॲड. नकुल पार्सेकर ग्राहक संरक्षण परिषद, सिंधुदुर्गचे अशासकीय सदस्य यांचा लेख.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


