सावंतवाडी : शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल येथे उपप्राचार्य पदी कार्यान्वित असलेले डॉ. संदेश सोमनाचे यांची ‘मेथोडिकल अप्रोच टू नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टम आणि इसेन्शिअल्स ऑफ डोसेज फॉर्म डिझाइन’ ही दोन पुस्तके प्रशांत बुक पब्लिशर अँड डिस्ट्रीब्यूटर, न्यू दिल्ली यांच्याकडून प्रकाशित करण्यात आली.

तसेच महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदी कार्यरत असलेल्या कु. मेघा जाधव व कु. वर्षा राणे यांचे ‘बायोस्टेटिस्ट अँड रिसर्च मेथोडॉलॉजी’ हे पुस्तक क्रिपा दृष्टी पब्लिकेशन, पुणे यांनी प्रकाशित केले.

सदरील पुस्तके ही बी. फार्म, एम. फार्म अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाच्या उत्तरोत्तर होणाऱ्या प्रगतीचा चढता आलेखासाठी संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांनी प्रशंसा करून अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच प्रशासकीय अधिकारी श्री. पंकज पाटील व महाविद्यालयीन प्राचार्य डॉ सुनील शिंगाडे यांनी अभिनंदन केले.


