सावंतवाडी : सावंतवाडी येथील श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्था लवकरच शेअर्स उभारणार असून
सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती असलेल्या प्रस्तावित संत गाडगेबाबा महाराज भाजी मंडई येथील व्यापारी संकुलामध्ये पतसंस्थेचे कार्यालय नेणार असून त्याचा फायदा सर्वसामान्य भाजीविक्रेत्या महिला तसेच गोरगरिबांना होणार आहे. या पतसंस्थेला ऊर्जेतावस्था आणण्यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून शेअर्स उभारण्याचा संकल्प पतसंस्थेचे चेअरमन गोविंद बाळा वाडकर यांनी व्यक्त केला.
संत श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या बाविसाव्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पतसंस्थेचे चेअरमन गोविंद वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मध्ये असलेली ही सहकारी पतसंस्था नफ्यामध्ये असून एकूण नफा दोन लाख 57 हजार 647 रुपये झाला असून पतसंस्था आणखी पथक प्रगतीपथावर नेण्यासाठी कार्यकारी मंडळासह सभासदांनी सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन श्री. वाडकर यांनी केले.
सभेची सुरुवात कधी मंडळ वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आले. त्यानंतर बेरीज पत्रक, ताळेबंद व नफा – तोटा पत्रकाचे वाचन करून मंजुरी देण्यात आली. अंदाजपत्रकापेक्षा कमी अधिक झालेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. तसेच अंदाजपत्रकासही मंजुरी देण्यात आली. संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे नफा विभागणी मंजुरी देण्यात आली तर अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या विषयावरही चर्चा करण्यात आली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष चेअरमन श्री. वाडकर यांनी आतापर्यंत ही संस्था अत्यंत मेहनत आणि परिश्रमाने उभी केली असून याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पतसंस्थेच्या कर्मचारी व संचालकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये एनएमएमएस या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आलेली श्वेता देऊस्कर हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी लक्ष्मण आरोसकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सावंतवाडी शाखाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या दोडामार्ग शाखाधिकारी पदी जगदीश चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपाध्यक्ष बाबुराव चव्हाण, संचालक गणेश म्हापणकर, प्रकाश रेडकर, दिगंबर पावसकर, पी. बी चव्हाण, मंगेश कदम, भरत लाखे, संगीता वाडकर, सुलोचना वाडकर यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक सदानंद चव्हाण, दशरथ वाडकर, डी. जे. इन्सुलकर, नारायण केसरकर, मानसी कदम, ईशा चव्हाण, राजश्री चव्हाण, रामकृष्ण देऊसकर, मोहिनी कांबळे, संजना आंबेडकर, लता चव्हाण आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक पी. बी. चव्हाण यांनी केले.


