देवगड : विज्ञान म्हणजे मानवाला लाभलेलं वरदान आहे. मात्र ते अवलंबून आहे ते त्याच्या वापरकर्त्याच्या मानसिकतेवर असे प्रतिपादन तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ तळेबाजार या संस्थेचे अध्यक्ष संदीप तेली यांनी केले.


अखिल भारतीय तालुकास्तरीय विज्ञान मेळावा सन २०२५ – २६ तालुक्यातील महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार या प्रशालेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री. तेली बोलत होते.

सदर मेळाव्याचे उद्घाटन तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ तळेबाजार या संस्थेचे अध्यक्ष संदीप तेली यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, खजिनदार संतोष वरेरकर, सचिव कृष्णा साटम, सदस्य बाळकृष्ण पारकर, विश्वास सावंत, संजय जाधव तसेच शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, संघटक प्रा. रूपेश पाटील, कुडाळ तालुकाध्यक्ष सचिन कुडाळकर, तसेच देवगड हायस्कूलचे शिक्षक श्री. येडगे, स्पर्धा परीक्षक आयटीआय जामसंडेचे शिक्षक सुरज भिडे, देवगड ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका श्रीमती पूजा कोकितकर व श्रीमती मृणाली ढोके, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे जिल्हा संघटक व पेंढरी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. लाडगावकर सर व देवगड तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष श्री. कर्ले सर, तळेबाजार प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश वाळके सर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप तेली यांनी दीपप्रज्वलनाने केले. त्यानंतर ईशस्तवन, स्वागत गीत व विज्ञान गीत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापकांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.
यावेळी सुप्रसिद्ध निवेदक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तेली सर व आभार श्री. कदम सर यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी देवगड तालुक्यातील आठ शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा विषय होता ‘क्वांटम युगाची सुरुवात – संभाव्यता व आव्हाने’
या स्पर्धेत प्रथम क्रमांक महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी वृषाली धनंजय कुळये, द्वितीय क्रमांक मुणगे हायस्कूलचा विद्यार्थी दीक्षांत मांजरेकर व तृतीय क्रमांक देवगड हायस्कूलची विद्यार्थिनी कु. नागरगोजे यांनी पटकावला. विजेत्याना आकर्षक चषक व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.


