आंबोली : माजी खासदार तथा ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब यांनी सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला विशेष भेट दिली. या दौऱ्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी एनडीए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) साठी एसएसबी (सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड) मुलाखतीचे सखोल मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थी आणि उपस्थितांना सशस्त्र दलांमधील करिअरच्या संधी, एसएसबी मुलाखतीची प्रक्रिया, त्यातील शारीरिक व मानसिक तयारी या विषयावर अत्यंत प्रेरणादायी आणि माहिती पूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी मुलाखती दरम्यान होणाऱ्या चाचण्यांची रूपरेषा, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि सम विचार कसे महत्वाचे आहेत हे याचे उदाहरणासहित विवेचन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी ब्रिगेडिअर साहेबांना विविध प्रश्न विचारून मार्गदर्शन घेतले. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये देश सेवेचा अभिमान जागवला गेला आणि एनडीए मध्ये प्रवेश घेण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली.
सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज हे सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करत असून या पुढील काळात वेगवेगळे उपक्रम राबविण्याबाबत संस्थेचे अध्यक्ष श्री.सुनिल राऊळ यांना सांगितले. तसेच शाळेला वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहकार्य आपणाकडून करण्यात येईल, असे सांगितले. श्री. सुनिल राऊळ यांनी देखील विविध उपक्रम राबविण्याबाबत आश्वासन दिले. आजचा दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यात निश्चितच एक प्रेरणादायी क्षण ठरला.
या विशेष प्रसंगी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री.सुनिल राऊळ, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन श्री. बाबूराव कविटकर साहेब, कार्यालयीन सचिव श्री दिपक राऊळ शाळेचे प्राचार्य श्री. नितीन गावडे डॉ.विलास सावंत कृषी विज्ञान केंद्र किर्लोस व सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आंबोली येथे विशेष भेट व एनडीए मार्गदर्शन सत्र.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


