आंबोली : दिनांक ४/८/२०२५ ओरोस येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय मुष्टीयुद्ध (बॉक्सिंग )स्पर्धेत सैनिक स्कूलच्या बाल जवानांनी घवघवीत यश संपादन केले. 14 वर्षे वयोगटातील विजेते….. 34 ते 38 वजनी गटात सत्यजित रामचंद्र हांडे देशमुख (प्रथम ) 40 ते 43 वजनी गटात दत्ताराम संदीप शेलार (प्रथम )28 ते 30 वजनी गटात रिषभ कुमार राजेश्वर मेहता (द्वितीय ) क्रमांकाचे मानकरी ठरले. ……..सतरा वर्ष वयोगटात जयंत नारायण शिरसाट (प्रथम )55 ते 57 वजनी गटात पार्थ प्रसाद नाईक (प्रथम)75 ते 80 वजनी गटात एरोन जूड फर्नांडिस (प्रथम )70 ते 75 वजनी गटात आर्यन संतोष धणक (प्रथम ) 66 ते 70 वजनी गटात ऑस्टिन सिल्वेस्टर ब्रिटो ( प्रथम ) तर 46 ते 48 वजनी गटात कृष्णा भारत हिवरे (द्वितीय) स्थानावर विराजमान झाले.19 वर्षे वयोगटात 55 ते 60 वजनी गटात यश अनंत धुरी याने प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक दिनेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी स्पर्धकांचे कार्याध्यक्ष सुनील राऊळ, संचालक जाॅय डॉन्टस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले. तसेच त्यांच्या भावी स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.


