मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. राज्यराणी एक्सप्रेसचे तिकिट दर कमी होण्याचा अंदाज आहे. नांदेड ते मुंबई आणि मुंबई ते नांदेड प्रवास करणाऱ्यांसाठी ही गोड बातमी आहे. मुंबई ते नांदेड दरम्यान चालणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेसच्या संरचने बदल करण्यात आली. आता गाडीच्या डब्यात वाढ करण्यात आलीये. शयनयान डबा कमी करण्यात आलाय आणि चेअर कारचा डबा वाढेल. यामुळे तिकिटाचे दर कमी होणार आहेत. राज्यराणी एक्स्प्रेसला एकूण 17 डब्बे आहेत. आता नवीन डब्यांमुळे गाडीचा वेग वाढणार आहे आणि तिकिट दरही कमी होईल.
गाडी क्रमांक 17611 हुजूर साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस ही सुधारित संरचनेसह हुजूर साहेब नांदेड येथून ४ ऑगस्टला धावली आहे. विशेष म्हणजे डब्यांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रवाशांसाठी ते फायदेशीर झाले आहे. अचानक जाण्याची वेळ आल्यास या गाडीचे तिकिट प्रवाशांना मिळू शकते.


