कणकवली : येथील विद्यामंदिर प्राथमिक विभागातील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनात्मक कल्पकतेने शिक्षक आणि पालक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रंगांच्या आणि आकारांच्या आकर्षित राख्या तयार करून भारत देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना सिमेवर पाठवून दिल्या प्रशालेमार्फत एक हजार राख्या तयार करून देशाची सेवा करणाऱ्या सैनिकां बद्दल कृतज्ञता व्यक्त केली . मुख्याध्यापिका सौ करंबेळकर मॅडम यांनी या उपक्रमाविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थी व शिक्षक / पालक यांच्या सहकार्यातून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना सैनिकांच्या बद्दल असणारे देशप्रेम व्यक्त करण्याचे शिक्षण देण्यात आले प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन विद्यार्थांना सहकार्य केले.

मुख्याध्यापक पी. जे. कांबळे सर, पर्यवेक्षक अच्युतराव वणवे सर यांनी सर्व विद्यार्थ्याचे कौतुक केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. तवटे, चेअरमन डॉ. सौ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, विश्वस्त अनिलपंत डेगवेकर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.


