कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळाचे, कणकवली कॉलेज कणकवली येथे रसायनशास्त्र विभागातर्फे २ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय रसायनशास्त्राचे जनक आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी विचारमंचावर प्राचार्य युवराज महालिंगे, ज्युनिअर कॉलेज पर्यवेक्षक प्रा. महादेव माने, प्रा. डॉ. बी . एल.राठोड, व प्रा. अविनाश पोरे उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य युवराज महालिंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, सर प्रफुल्ल चंद्र रे यांनी भारताच्या पारतंत्र्याच्या काळात देखील रसायनशास्त्रामध्ये संशोधन करून त्याचा उपयोग उद्योग उभारणीसाठी केला. त्याचबरोबर त्यांनी प्राचीन भारतातील रसायन शास्त्रावरील माहिती जगापुढे आणण्यासाठी ‘ हिस्ट्री ऑफ हिंदू केमिस्ट्री ‘ नावाचे पुस्तक लिहिले. ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा.महादेव माने यांनी आचार्य रे यांच्या रसायनशासत्रातील कार्याचा आढावा घेताना, आजही केमिस्ट्री हा विषय महत्त्वाचा असून या विषयातून करिअरच्या वाटा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत, असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांचे कार्य आणि जीवनावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविका मध्ये प्रा.अविनाश पोरे यांनी आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांनी ‘ मर्क्युरस नायट्रेट’ या रासायनिक संयुगावर केलेल्या संशोधनाची आणि त्यांनी सुरु केलेल्या भारतातील पहिली रसायन उत्पादन कंपनी ‘ बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ ची माहिती विद्यार्थ्यांना दिली व त्यामुळे भारताच्या प्रगतीस मिळालेली आर्थिक चालना याबाबतची माहिती विशद केली. सूत्रसंचालन कु. प्रणाली पवार आणि कु. प्रेरणा जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन कु. दिक्षा मळये हिने मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.हेमंत गावित, प्रा. कपिल गडेकर, प्रा. अमरेश सातोसे, प्रा.अक्षय जाधव, शिक्षकेतर कर्मचारी गुरूनाथ सावंत, रविंद्र लाड, विलास कदम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कणकवली महाविद्यालयात ‘राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन’ साजरा !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


