सावंतवाडी : राज्याचे कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वाफोली ग्रामपंचायतला भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. वाफोली ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणाच्या सर्व प्रकारच्या ऑनलाईन दाखले व इतर सेवा अंतर्गत दाखले संबंधित लाभाथ्य्यांना त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच जलजीवन मिशन नळयोजना कामाची पाहणी केली. वझरीवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभर्थ्यांना घरकुलाच्या चाव्या वितरीत करण्यात आल्या. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर व फळबाग व बांबू लागवडीची पाहणी केली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १, वाफोली टेंबवाडी अंगणवाडी इत्यादी कामांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशालेतील विद्यार्ध्यांशी सुसंवाद साधला.
यावेळी कोकण विभाग अपर आयुक्त डॉ. माणिक दिवे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी जगदीश खेबुडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, विस्तार अधिकारी अंकुश जंगले, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, ग्रामपंचायत अधिकारी प्रसाद ठाकूर, सदस्य सौ. मंजुळा शेगडे, सौ. साक्षी शिरोडकर, केंद्रचालक सौ. दया गावकर देसाई आदी उपस्थित होते. निसर्गरम्य वाफोली गावातील विविध विकासकामांचा दर्जा पाहून विभागीय आयुक्त श्री. सूर्यवंशीन यांनी ग्रामपंचायत वाफोली, पंचायत समिती सावंतवाडीच्या सर्व टीमचे कौतुक केले.


