Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सात जणांनी कोयता, हॉकी स्टिकने बेदम मारलं, पाय बांधून गाडीत बसवलं अन्…; अपहरण झालेल्या पडळकरांच्या कार्यकर्त्याची आपबीती!

सोलापूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे सोलापुरातून अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करुन हत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शरणु हांडे असे अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर समर्थकाचे नाव आहे. पोलिसांना अपहरण झाल्याची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांचे चार पथके शोधासाठी रवाना झाले होते. काल गुरुवारी (दि. 07) रात्री 10 वाजेच्या सुमारास पोलिसांनी  अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. अमित सुरवसे हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा समर्थक असल्याची माहिती समोर येत आहे. आता अपहरण झालेल्या शरणु हांडे याने आपबिती सांगितली आहे.

काय म्हणाला शरणू हांडे? 

शरणू हांडे याने एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की,  मी पानटपरीच्या इथे उभा असताना गाडीतून ते लोक आले. माझ्यावर वार केले. त्यानंतर मला पायाला बांधून गाडीत बसवले आणि त्यांनी मला नेले. ते सात जण होते. कोयता, हॉकी स्टिक आणि तलवारीने मला मारहाण करण्यात आली. पण पोलीस आले अन् माझी सुटका केली, अशी माहिती त्याने दिली आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे सोलापुरातून अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करुन हत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शरणु हांडे असे अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर समर्थकाचे नाव आहे. पोलिसांना अपहरण झाल्याची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांचे चार पथके शोधासाठी रवाना झाले होते. काल गुरुवारी (दि. 07) रात्री 10 वाजेच्या सुमारास पोलिसांनी  अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. अमित सुरवसे हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा समर्थक असल्याची माहिती समोर येत आहे. आता अपहरण झालेल्या शरणु हांडे याने आपबिती सांगितली आहे.

काय म्हणाला शरणू हांडे? 

शरणू हांडे याने एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की,  मी पानटपरीच्या इथे उभा असताना गाडीतून ते लोक आले. माझ्यावर वार केले. त्यानंतर मला पायाला बांधून गाडीत बसवले आणि त्यांनी मला नेले. ते सात जण होते. कोयता, हॉकी स्टिक आणि तलवारीने मला मारहाण करण्यात आली. पण पोलीस आले अन् माझी सुटका केली, अशी माहिती त्याने दिली आहे.

दरम्यान, जखमी शरणू हांडे याच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी शरणु हांडे याचा भाऊ विष्णू शिवराया हांडे याने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी अमित सुरवसेसह 4 अनोळखी साथीदारांविरोधात भारतीय न्याय संहिता 140 (1), 189 (2), 189 (4), 191 (2), 191 (3), 190 आणि शस्त्र अधिनियम कलम 4, 25 अनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles