Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

देशाला महासत्ता करण्यासाठी एकमेकांचा द्वेष नको, साथ द्या.! – खासदार नारायण राणे यांचे आवाहन. ; आमदार नितेश राणे पुरस्कृत भव्य दहीहंडी उत्सवाचा शानदार शुभारंभ.

कणकवली : ”एकमेकांचा द्वेष करू नका तर एकमेकाला साथ द्या. दहीहंडी फोडण्यासाठी जसे गोविंदा पथक एका दुसऱ्याला हात देतात आणि थरावर थर रचता असतात. असे मानवी मनोरे आपणही जीवनात रचले पाहिजे. देशासाठी राज्य, जिल्हा आणि गावासाठी,देशाच्या सर्वांगीण विकासासाठी एक जुट ठेवा. एका दुसऱ्याची साथ करून आपण भारत देश महासत्ता घडवूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेला देशाचा विकास करूया.!”, असे आवाहन माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केले. यावेळी सिने अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात जे काम केले आणि आता त्याची सुरू असलेली जनसेवेचे दाखले देत त्यांच्या समाज सेवेचे अनुकरण इतरांनी करावे, असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले.

 

भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे पुरस्कृत भव्य दहीहंडी उत्सवात अपूर्व उत्साहात अलोट गर्दीत प्रारंभ झाला. माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या उपस्थित या दहीहंडी उत्सवाला प्रारंभ झाला.


यावेळी सिने अभिनेता सोनू सूद,माजी खासदार नितेश राणे,आमदार नितेश राणे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,महिला जिल्हाध्यक्ष शेता कोरगावकर,यांच्या सह जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,माजी जी.प. उप अध्यक्ष रणजित देसाई, संदीप साटम,संतोष कानडे, अशोक भाऊ राणे,मनोज रावराणे भाजप मागास सेल जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव भाजप जिल्हाउपाध्यक्ष गोट्या सावंत, समीर नलावडे, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, अण्णा कोदे, दिलीप तळेकर,संजना सावंत, संजना सदडेकर, मेघा गणंगण, सौ. साटम,सौ. पवार, साक्षी वाळकेसुप्रिया नालावदे,भाजप मागास सेल जिल्हाध्यक्ष नामदेव जाधवतालुका अध्यक्ष दिलीप तळेकर, संजना सावंत,संजना सदडेकर,मेघा गणंगण,सौ.साटम, सौ. पवार,साक्षी वाळके, सुप्रिया नालावदे गणेश हर्णे यांच्या सहा महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles