Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

घर मालकाला बाथरूममध्ये कोंडलं अन् केलं मोठं कांड!

वसई : राज्यात गु्न्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज कुठे ना कुठे चोरी किंवा दरोड्याच्या घटना घडत असतात. अशातच आता वसईत धक्कादायक घटना घडली आहे. घरमालकाला बाथरूममध्ये बंद करून एका चोरट्याने भरदिवसा दीड कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यासह रोख रकमेची चोरी केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे वसईत खळबळ उडाली आहे.

दुपारी घडली घटना –

वसई पश्चिम शास्त्रीनगर येथील किशोर कुंज इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील उदय भानुशाली यांच्या घरात आज दुपारी साडे बारा ते एकच्या सुमारस ही चोरीची घटना घडली आहे. घरातील महिला ह्या रक्षाबंधनासाठी गेल्या होत्या. तर मुलं कामावर गेले होते. घरात एकटेच वयोवृद्ध उदय भानुशाली असताना ही चोरीची घटना घडली आहे.

मालकाला बाथरूममध्ये कोंडलं –

समोर आलेल्या महितीनुसार, भरदुपारी चोरट्याने डुप्लिकेट दाढी आणि तोंडाला मास्क लावून, ओळखीचा असल्याचा दाखवून घरात प्रवेश केला. त्यानंतर बाथरूम।ला गेला आणि तुमच्या बाथरूम लिकेज आहे असे सांगितले. त्यावेळी घरमालक पाहण्यासाठी गेले असता, त्यांना बाथरूम मध्ये ढकलून, त्यांना आतमध्ये कोंडले. त्यानंत घरातील सर्व सोने घेऊन चोरटा फरार झाला आहे.

वसईत खळबळ –

घरमालकाने बाथरूमची खिडकी तोडून, आरडाओरडा केल्यामुळे ही घटना उघड झाली आहे. याबाबत माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भरदिवसा एका वृद्धाला थरूम मध्ये कोंडून घरात चोरी झाल्याने वसईतील कायदा सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles