सिंधुदुर्ग : ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या १४ वर्षांखालील स्क्वॅश स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. वरील स्पर्धेत विद्यार्थिनींमध्ये इयत्ता सातवीची कु. अस्मी सावंत हिने प्रथम स्थान व कु. पूर्वी आरोलकर हिने द्वितीय स्थान पटकावले.
तर विद्यार्थ्यांमध्ये कु. रिचर्ड रॉड्रिग्ज याने द्वितीय स्थान व कु. रोनक पवार याने तृतीय स्थान प्राप्त केले. वरील सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील क्रीडा शिक्षक समद शेख व हमीद शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या विजेत्या विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


